गोवर्धन येथे मशाल फेरीचे आयोजन
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर
आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 ला मुल तालुक्यातील मोजा गोवर्धन येथे रात्रो 8.00 वाजता मशाल फेरी काढण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मुल द्वारे गोवर्धन येथे PIP गरिबातील गरीब ओळख प्रक्रियेचा पहिला दिवस राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाला धनश्री महिला ग्राम संघाचे अध्यक्ष सौ मंदाबाई लाकडे यांचे उपस्थितीत मशाल फेरी काढण्यात आली.
गावातील सर्व रस्त्याने मशाल फेरी काढण्यात आली मशाल फेरी च्या माध्यमातून गावातील प्राथमिक माहिती घेण्यात आली. या कार्यक्रमाला प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. पोर्णिमा खोब्रागडे CTC, सौ. चंदा खोब्रागडे ICRP, रोशनी राहुलवार उध्योगसखी, किरण नरस्पूरे लीपिका, कल्पना खोब्रागडे, मंगल कडुकर, मनीषा रायपले यांनी सहकार्य केले.