ताज्या घडामोडी

गिरगाव व मिंडाळा या गावांना महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समीतीनी दिली भेट

तालुका प्रतिनिधी : कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड तालुक्यातील गिरगाव व मिंडाळा या गावांना महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समीती भेट दिली. ग्राम .पंचायत मिंडाळा ला महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समीती अंतर्गत तपासणी दौरा टीम दाखल झाली. या तपासणी दौरा अंतर्गत ग्राम पंचायतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मामा तलाव खोलीकरण आणि नाला खोलीकरण या कामावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे विविध कामाची पाहणी करून आढावा घेतला. समिती प्रमुख आ. मनोहर चांद्रीकापुर्, आ. नरेंद्र दराडे, आमदार राजेश पाटील, आ. अमोल मीटकारी , विधान परिषद आ. तसेच तहसीलदार मनोज चव्हाण, संजय गजपुरे जिल्हा परिषद सदस्य, विनोद नवघडे , पंचायत समिती सदस्य प्रणया गड्डमवार, संवर्ग विकास अधिकारी, राऊत, फतींग लाडे , रामटेक ग्राम पंचायत सेवक गणेश गड्डमवार सरपंच आणि ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close