ताज्या घडामोडी

पाथरी न.प.हद्दवाढी बाबत शासनाचे अभिनंदन

१३ पैकी १२ सदस्यांची बैठकीस होती उपस्थिती.

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र व संकेतस्थळावर पाथरी नगर परिषद च्या हद्दवाढी ची उद्दघोषणा झाली असुन या हद्दवाढीत देवनांद्रा ग्रामपंचायतीचा काही भाग येत असल्याने ते नागरीकांच्या हिताचे व वाढीव सुखसोई मिळतील या उद्देशाने देवनांद्रा ग्रामपंचायतीने या हद्दवाढीबद्दल शासनाचे अभिनंदन केले बाबत चा ठराव १६ जुलै रोजी घेतला असुन त्यास ८ सदस्यांनी मंजूरी दिली आहे.
देवनांद्रा ग्रामपंचायत कार्यालयात १६ जुलै रोजी ११ वा.बैठक घेण्यात आली यामध्ये १३ पैकी १२ सदस्य उपस्थित होते. यामधील ठराव क्रं ५ नुसार सदस्य कमलाबाई बळीराम राठोड यांनी असे सुचवले की, महाराष्ट्र शासन रात्रपत्र, असाधारण क्रमाक ३४ दि.३० जुन २०२१रोजी शासनाच्या राजपत्रात व संकेतस्थळावर पाथरी नगर परिषद ची हद्दवाढीची उद्घोषणा झाली आहे. देवनांद्रा ग्रामपंचायतीचा काही भाग म्हणजे ज्ञानेश्वर नगर
जवाहर नगर, नरेंद्रनगर, सागर कॉलनी ,तुळजा भवानी नगर ,विठ्ठल नगर, गुलशन नगर
साखर कारखाना परिसर ,गणेश नगर याभागात पाथरी नगर परिषदे कडुन आजपर्यंत पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे.याशिवाय नागरिकांना सुविधा पुरवण्यात येतात परंतू पुर्णत: सुविधा दिल्या जात नसल्याने येथील नागरीकांची गैरसोय होत होती.परंतू आत्ता शासनाने हा भाग पाथरी नगर परिषद हद्दवाढीत सामाविष्ट केल्याने या भागातील नागरीकांना पुर्ण सुविधा मिळतील याकरीता देवनांद्रा ग्रामपंचायत चा गावठाण भाग वगळता ईतर भागासाठी होणाऱ्या हद्दवाढीस ग्रामपंचायत ची हारकत नसुन या निर्णयाबद्दल ग्रामपंचायत कडून अभिनंदन चा ठराव मांडला यास सदस्य सुशीला भागवत गायकवाड यांनी अनुमोदन दिले व हा ठराव सरपंच अशफाक खान,नितिन शिंदे,दिगांबर लिपने,सुशीला गायकवाड, सुमनबाई वाघमारे, निलोफर अन्सारी, सि.अनवीरा सि बशिर,कमलाबाई राठोड या सदस्यांनी मंजुर केला आहे.मात्र अजय थोरे ,उध्दव थोरे,सिंधबाई केंदळे,जयश्री ढगे या चौघांनी या ठरावास विरोध दर्शविला.
परंतू उपसरपंच अजय पंडीतराव थोरे यांनी असे मत मांडले की, साखर कारखान्याचे पाच गट जे की, गट क्रं 276,277,278,279,
298 व गावठाण मधील काही शेतकऱ्यांचे गट सोडून इतर भाग नगर परिषद पाथरी मध्ये सामाविष्ट झाल्यास आमची काही हारकत नाही असे मत मांडले.
एकंदरीत पाथरी नगर परिषद हद्दवाढी बाबत देवनांद्रा ग्रामपंचायत अनुकूल असल्याचे समोर आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close