ताज्या घडामोडी

प.पू.वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी गुरुकुंज सेवाआश्रम मोझरी येथे कार्यक्रमास भेट देऊन मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

आज दि. २५ ऑक्टोबर रोजी आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज सेवाआश्रम मोझरी जि. अमरावती येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थित मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व गुरुदेव सेवकांनी आ. बंटीभाऊ भांगडीया यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती. यशोमतीताई ठाकुर, प्रकाश महाराज वाघ, गुरुदेव सेवा मंडळ मोझरी चे सर्वाधिकारी जनार्दनजी बोथे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुरकर, डॉ. श्यामजी हटवादे, भाजपा चंद्रपूर जिल्हासचिव राजुभाऊ देवतळे, भाजपा युवा नेते समीर राचलवार आदी भाजपा पदाधिकारी व गुरुदेव सेवक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close