सवित्रीमाईला अपेक्षीत असलेल्या सवित्रीच्या लेकी आपन खरोखरच आहोत का?-समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
सवित्रीबाई फुले भारतिय स्त्री मुक्तीच्या जनक होत्या आपल्या आयुष्यातिल काट्याची फुले करुण ज्या काळात स्त्रीला स्वताच्या अस्तित्वाची जानीव नव्हती त्याकाळात स्त्रीयांना हक्क व अधीकाराची जानीव करुण दिली व्यवस्थेने त्यांच्या अंगावर फेकलेल्या शेनाची दगड धोंडाची पर्वा सवित्रीमाईनी कधीही केली नाही हा अपमान कोनासाठी सहन केला व का केला असेल?आम्हा स्त्रीवर्गासाठी हा क्षनभर विचार व आत्मचितंन करन्यासारखे आहे सवित्रीबाई फुलेची जयंतीनिम्मीतच त्यांची आठवन करायची का? त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आम्हास्त्री वर्गावर आहे सवित्रीमाई कळन्यासाठी अजुन आम्हाला किती वेळ लागनार आहे सवित्रीमाई ला अपेक्षित सवित्रीच्या लेकी आपन आहोत का?असे परखड सवाल ड्रा बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षन सस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी माळी समाज नवतळा येथे सवित्रीबाईफुले जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात केला या कार्यक्रमाचे अद्यक्ष आदिवासी आश्रमशाळेचे मुख्य्ध्यापक सुकारे होते प्रमुख अतिथी राजू देवतळे भाजपा ओबीशी प्रदेशाध्य्क्ष तथा गुरुदेव प्रचारक मौज़री ,बालू पिसे भाजप युवा तालुका अद्यक्ष, रमेश कंचरलवार उपसरपंच तूळशीराम शिवरकर,ग्रा सदस्य संगीता टेम्भुर्ने,कविता वसाके,गिताबाई कैकाडे,सुनदाताई शेंडे, मुकनायक फाउडेशंनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, प्रा. ठवरे,प्रा.चटपकार,केल्झरकर गुलाबराव श्रीरामे,गोपाळराव गुरनुले अण्णाजी वसाके आदी मान्यवर उपस्थीत होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या सवित्रीमाई मुळे आम्ही स्वतचे सक्षम आकाश निर्माण करु शकलो शैक्षनिक, आर्थिक राजकिय ओळख निर्माण करु शकलो आनी कायद्याच्या सरक्षणनामूळे जास्त सक्षम आहोत पन खरया अर्थाने सवित्रीमाईनी समाजीक समता निर्माण करण्यासाठी रुढी परंपराना छेद देवून नवविचारांची कास धरायला लावली त्यांची ही दुरदृस्टी समाजात आजही काहि चुकिच्या प्रथा आहेत त्यांना कायमचे नस्ठ करण्यासाठी आम्ही काहि भूमिका सवीकारल्या आहेत का ?
कर्मठ व रुढीवादी समाजात प्रवाहाच्या विरोधात वाहने हे सोपे नसते ते धाडश हिम्मत सवित्रीमाईनी सवित्रीच्या लेकीना दिली आहे पन प्रवाहाच्या विरोधात लीहणे बोलने ही हिम्मत महिलामंधे आली आहे का?सवित्रीना अपेक्षीत सवित्रीची लेक ही विज्ञानाची कास धरनारी स्वाभीमानी व आत्मनिर्भर स्त्री जानीवाचा निर्भर हुंकार अशी होती आपंन खरच विज्ञानयुगात तो हुंकार निर्माण करु शकलो का?स्त्री मुक्ती कश्यातुन स्वतच स्वताच्या बांधलेल्या बंधनातुन की आपल्या मानशिकबुद्धीतुन सक्षम अजुनही आपन आहोत का?स्त्री पुरुष समानता असली पाहिजे अशी म्हननारी समाजव्यवस्था स्त्रीभृन ह्त्या करते, हुंडाबळी पडते तेव्हा कितीतरी महिला वर्गचुपचाप असतात सवित्रीमाईना हे अपेक्षित होते का?त्यानी वीधवानो तूम्हि इथे या मी तुमचे बाळन्तपंन करते असे वाटचूकलेल्या स्त्रीवर्गाना आधार दिला आज मुलीचे पावूल कदाचित चुकीचे पडले किवा तिच्यावर समाजकंटकानी अत्याचार केला तर समाज महिलावर्ग तिला नव्याने जगन्याची प्रेरणा आत्मविश्वास आधार सन्मान देणार का ?विधवा महीलाना हळदीकुकू कार्यक्रमात आम्ही बोलवणार की नाही? तृतीयपंथीयाना आम्ही समाजातिल सर्व समान संधी देणार आहोत की नाही? शिक्षन हे मानवी जिवनात कितीतरी बदल घडवते स्त्री शिकली म्हणजे समाजात चांगला बदल घडवुन आणू शकते व्यवस्थेला प्रश्न विचारते मुक्ता साळवे सारखी धर्मचिकित्सक व्यवस्थेला प्रश्न विचारनारी सवित्रीमाई च्या विद्यार्थ्यांनी सारखी आमी हिम्मत धर्यवाण विद्यार्थिनी घडू शकनार की नाही?सवित्रीमाईनी
परिवर्तनाचा वसा तुम्हा आम्हासाठी घेतला होता सवित्रीची लेकवैचारिक पातळी असलेली आजची शिक्षीत महिला आपनच आहोत तेव्हा सवित्रीच्या विचारातुन सक्षम होने गरजचे आहे प्रस्थापित सरकारने सवित्रीबाई फुले महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कारानी सन्मानित करावे अशी आशासुधा समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी व्यक्त केली हीच सावित्रीमाईला खरी आदरांजली होयिल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अद्यक्ष महादेव कोकोडे यांनी केले तर संचालन व आभार योगेश कोटरंगे यांनी केले यावेळी समस्त माळी समाज उपस्थित होता