डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कारसाठी सहज सुचलंच्या जेष्ठ साहित्यिका विजया पिटके-तत्वादी यांची निवड

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
साहित्य लेणी विचारमंच (भारत) सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्या विद्यमाने शैक्षणिक,सांस्कृतिक, साहित्यिक ,व धार्मिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनिय कार्य करणांऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं काव्यकुंजच्या एक जेष्ठ साहित्यिका विजया पिटके- तत्वादी सिकंदराबाद यांची निवड करण्यात आली आहे.त्या विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मुळ रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य सिकंदराबाद येथे आहे.येत्या 16 एफ्रिलला सकाळी 10-30 वाजता रेडक्राॅस (रोटरी)भवन (आझाद बगीचा जवळ बॅरिस्टर चौक) चंद्रपूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकातून सदरहु संस्थेच्या संस्थापिका तथा अध्यक्षा भावना खोब्रागडे यांनी दिली आहे .या पुर्वी देखिल जेष्ठ लेखिका विजया पिटके तत्वादी यांना विदर्भातील विविध सामाजिक व साहित्यिक संस्थेकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.