श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात ६२ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला, सकाळी ७ वाजता शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे तसेच पदाधिकारी सर्व संस्था सभासद , शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर सर, रवींद्र खोडवे, मिलिंद वेडे ,कमलाकर झोडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उमेश थाटकर यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व व पार्श्वभूमी उपस्थितांसमोर मांडली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार व सुत्रसंचालन विभाग प्रमुख उमेश थाटकर यांनी केले.