माजी जि.प.अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते भव्य व्हॉलीबॉल सामन्यांचा उदघाटन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी, मौजा- आरेंदा येथे भव्य व्हॉलीबॉल सामनेचा उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष सौ.भाग्यश्री ताई आत्राम व सह उदघाटन सौ.वंजे ताई तलांडी माजी सरपंच आरेंदा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कोत्ताजी आत्राम,गाव पाटील आरेंदा, सह अध्यक्ष श्री.पेंटाजी वेलादी गाव भुमिया आरेंदा हे होते.
यावेळी मौजा-आरेंदा गावातील नागरिकांनी पारंपरिक रेल्ला नृत्य ने मा.सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांचे भव्य स्वागत करण्यात आला.
यावेळी सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांनी व्हॉलीबॉल सामनेचा उदघाटन कार्यक्रमात आरेंदा गावातील नागरीकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, युवकांनी शिक्षणा सोबत क्रीडा क्षेत्रामध्ये ही लक्ष दिलं पाहिजे . कारण क्रीडा मध्ये सुद्धा आपण आपले गावाचा आणि समाजाचा नाव पुढे नेऊ शकतो. व सोबतच आपला गावाचा ही विकास होणे गरजेचे असते.म्हणून मा.आमदार श्री.धर्मराव बाबा आत्राम साहेब हे आपला आरेंदा गावाचा विकास करायला आणि निधी देहायला ही तयार आहे. तुम्ही तुमचे गावातील समस्या सांगा आणि मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्याशी जुडून राहा असे मार्गदर्शनात म्हणाले.
यावेळी उपस्थित येरमणार चे सरपंच श्री.बालाजी गावडे, श्री. कैलाश कोरेत माजी ग्रा.पं.सदस्य आलापल्ली, श्री बाबुराव तोर्रेम सामाजिक कार्यकर्ता भंगारामपेठा, श्री.रामजी आत्राम ( कोतवाल ), श्री.अनिल दुर्गे, श्री. सुनील दुर्गे, श्री.राकेश महा, श्री. इरपा तलांडी, तुळशीराम आत्राम, श्री.महारु आत्राम, श्री.साधु आत्राम, श्री.करपा आत्राम, श्री. डोलेश आत्राम, श्री.सचिन दाहगावकर, श्री.रमेश हजारे, श्री. प्रकाश दुर्गे, श्री.शैलेश आत्राम, श्री.संजय आत्राम, श्री.नागेश आत्राम तथा आरेंदा गावातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.