मासळ बु ग्रामपंचायत भाजप चा झेंडा

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर तालुक्यातील मासळ बु ग्रामपंचायतीवर आमदार किर्तीकुमार भांगडीया याचे निष्ठावंत कार्यकर्त भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री आशिफ शेख व माजी जिल्हापरिषद सदस्य डॉ देवनाथ गंधारे यांच्या नेतृत्वात ग्रामविकास पॅनल यश आले.त्यामुळे सरपंचपदी विकास महादेव धारणे तर उपसरपंचपदी प्रमोद कृष्णदास खापर्डे यांची निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायत मासळ बु येथील निवडणुक दिनांक १० फ्रेब्रुवारी ला पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश वासनिक यांनी काम पाहिले.येथे ९ सदस्यापैकी भारतीय जनता पार्टी प्रणित ४ तर कॉग्रेस प्रणित २ तर वंचित २ अपक्ष १ यावेळी कॉग्रेस प्रणित पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार संजय कवडू धारणे व भाजपाप्रणित सरपंचपदाचे उमेदवार विकास महादेव धारणे हे मैदान होते.यामध्ये विकास धारणे यांना वंचित चा एक उमेदवारांनी भाजपा प्रणित ग्रामविकास पॅनल कडे मतदान केल्याने सरपंचपदी विकास महादेव धारणे हे तर उपसरपंचपदी प्रमोद कृष्णदास खापर्डे यांची निवड करण्यात आली. निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यनी मोठया जल्लोष करून रॅली काढण्यात आली.