ताज्या घडामोडी

भंडारा चा राजा तर्फे आयोजित कोरोना योध्दांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

कोरोनाच्या काळात ज्या सामाजिक कार्यकर्त्यानी आपली जिवाची पर्वा न करता सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले त्यांचा कुठे तरी सन्मान व्हावा व समोरच्या वाटचाली करीता प्रोत्साहन मिळावे या करिता त्यांचा सत्कार व्हावे हे भंडारा चा राजा प्रतिष्ठान च्या पदाधिकार्यांनी विचार केला तसेच भंडारा चा राजा सामाजिक कामात अग्रेसर असतो अनाथांना मदत,अनाथ आश्रमाला भेट वस्तू, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण,पुरग्रस्तांना बैंकेट चादर वाटप,कोरोना काळात जनजागृती, यावर्षी तर भंडारा शहरांमध्ये शव वाहिनी गरज लक्षात घेता भंडारा चा राजा स्वर्गरथ चे लोकार्पण करण्यात आला,व लसीकरण ला प्रोत्साहन देण्यासाठी जेष्ठ नागरिक , विकलांग व आजारी लोकांना केंद्रापर्यंत ने आन करण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती अशे अनेक अपक्रम भंडारा चा राजा नी केले आहे .
आता कोरोना योध्दा चा सत्कार सत्कारमूर्ती मध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोकांनच्या मदती करता धावणारे श्री.संजयभाऊ एकापुरे, डॉ.राजीव गोधुळे,श्री.पवन मस्के,श्री.सुरजपरदेशी,श्री.
सुधाकर राव,श्री.स्वप्नील निमकर,श्री.रोशनकाटेखाये,श्री.
संजय चौधरी,श्री.अजय ब्राम्हणकर यांचा मान करण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी मंगेश वंजारी,मदन बागडे, सुनील घोडमारे,निमीष डोकरीमारे, निखिल वंजारी, बंटी आंभोरकर,रमेश कुंभलकर,अमोल घाटोळे,मुनेश्वर चकोले, अतुल वंजारी, गंगाधर राऊत, प्रदिप वंजारी, आकाश श्रावनकर,पप्पु कोल्हाटकर, मनोज बनकर,रोशन बनकर,सागर रायपूरकर,बाबा वंजारी, खुशाल पडोळे,बालु पडोळे,अजय वाघमारे अनेक पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close