स्वातंत्र दिनानिमित्त कृषी दुत्ताचे विहिरगाव येथे वृक्षारोपण

ग्रामीण प्रतिनिधी : पुरुषोत्तम वाळके चिमुर
डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला सलग्नित, श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय, शिर्ला(अंधारे) येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थांनी कृषि जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत कोरोना विषाणूच्या नियमाचे पालन करून कृषीदुत्त पुष्करण ईश्वर रंदये यांनी विहिरगाव येथे स्वातंत्र दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावातील सरपंच शीतलताई मुंढरे, उपसरपंच श्री.मधुकर गजभिये, ग्रामसेवक श्री.नैताम सर,पोलिस पाटिल कवडुजी नन्नावरे,माझी सरपंच रहेमान पठाण,कैलास ठवरे व तसेच गावातील सन्माननीय मान्यवर श्री.चिंधुजी गजभे ,श्री दिनकर रंदये ,श्री मंगेश जीवतोडे,रवी डोरलीकर, सुशील मेश्राम,रत्नाकर जीवतोडे,योगेश जीवतोडे,निलेश रंदये,आणि इतर सदस्यांनी उपस्थिती दर्शवली
या कार्यक्रमासाठी,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे सर , कार्यक्रम अधिकारी प्रा.गोपाल बेद्रे सर, प्रो. रोहित कनोजे सर,प्रो. उमेश वानखेडे व इतर प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.