आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ असलेल्या कचारगड देवस्थानाला “अ” दर्जा द्या!
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
राज्याचे पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केले
कचारगड गुफा आशिया खंडात सर्वात मोठी मानली जाते.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ कचारगड येथे असून कचारगडप्रती सबंध आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून कचारगड देवस्थानाला “अ” दर्जा द्या अशी तीव्र मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले असून नुकतेच राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केले आहे.
आ.धर्मराव बाबा आत्राम निवेदनात नमूद केले आहे की, कचारगड येथे आदिवासी बांधव व इतर समाजाचे नागरिक वर्षभर दर्शनासाठी येत असतात. माघ पौर्णिमेला भव्य यात्रा भरते. देशातून व राज्यातून लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी भाविक येत असतात, कचारगड येथील पारी कोपार लिंगो, माँ काली कंकाली देवस्थान हे राष्ट्रीय स्तरावरचे एकमेव देव व श्रद्धास्थान असून महाराष्ट्र राज्याच्या तिर्थक्षेत्राच्या यादीत कचारगड देवस्थानास ‘ब’ वर्गाचा तिर्थक्षेत्राचा दर्जा असून आता कचारगड तीर्थक्षेत्राला “अ”वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मागणी करून राज्याचे पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे कचारगड गुफा प्राचीन काळापासून नैसर्गिक निर्मित आहे. या गुफेतुन आदिवासी गोंडीयन धर्माचे संस्थापक पारी कुमार लिंगो यांनी धर्मप्रचार सुरू केले होते तेंव्हापासून या गुफेला आदिवासींचे उगम स्थान संबोधले जाते. अतिशय घनदाट जंगलात ही गुफा आहे. या परिसरात विविध गंभीर आजारांवर होणारे उपयोगात येणारी वनौषधी वनस्पतीसुद्धा आहेत.तसेच निसर्गनिर्मित विहिरसुद्धा आहे सदर विहिरीतील पाणी शंभर टक्के शुद्ध असल्याचे बोलले जाते. कचारगड तीर्थस्थळाला “अ” दर्जा दिल्यास सोयी-सुविधा आणि विदर्भात सर्वात मोठे पर्यटन व तिर्थस्थळ म्हणून नावारूपास येईल.
कचारगड आशिया खंडात सर्वात मोठी गुफा!
छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक निर्मित कचारगड गुफा आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा म्हणून ओळखली जाते, मात्र पर्यटन व पुरातन विभागाचे दुर्लक्षितपणामुळे कचारगड तीर्थक्षेत्र विकासापासून कोसो दूर आहे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पाठपुरावा सुरू केले आहे.
गोंदिया जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेले असून गोंदिया जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे पूर्वद्वार म्हणून ओळखले जाते. पुरेशी माहिती व सोयी सुविधांअभावी पर्यटकांना आशिया खंडातील सर्वात मोठी कचारगड गुफा दुर्लक्षित असून कचारगडला शासनाने “अ” दर्जा दिल्यास एक ऐतिहासिक व वेगळे महत्व प्राप्त होईल.