वाढत्या वीजबिल दारच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी चे कंदील भेट आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालया समोर आंदोलन.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावर वीज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येत असतात.परंतू सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिलाच्या संदर्भामध्ये वीज बिलाच्या आकारणीच्या संदर्भामध्ये,वीज मोफत देण्याचा संदर्भामध्ये एकही सरकार आज पर्यंत महाराष्ट्र मध्ये बोलताना दिसत नाही.याउलट महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनले आहेत त्या सरकारने सामान्य वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारुन लूट केली आहे.एकीकडे जनता लॉक डाऊन व कोरोना च्या भयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली आहे,दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे,तरी सरकारने वाढते वीज बिल दर कमी करावे व लॉक डाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे याकरिता दिनांक ६ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व ३५८ तालुक्यातील तहसील कार्यालयावर एकाच दिवशी कंदील भेट आंदोलन केले.त्याचाच एक भाग म्हणून पाथरी तालुक्यातील तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत १) २०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे.२) मीटर भाडे कपात करण्यात यावे.३) विजेच्या स्थिर आकारावर प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी.४) सक्तीची वीज बिल वसुली तत्काळ थांबवावी.५) ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्याच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात विज बिल निरंक पाठवावे.६) ३० दिवसानंतर रीडिंग घेणाऱ्या व्यक्ती वर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.यावेळी या आंदोलनास वेगवेगळ्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवून कंदील भेट आंदोलनाचे समर्थन केले.या आंदोलनाची सुरुवात पाथरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करुन ती रॅली तहसील कार्यालयाच्या समोर येऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.तसेच त्या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी बहुजन मुक्ती पार्टी,पाथरी चे तालुका प्रभारी प्रकाश इंगळे यांनी सरकारने लवकरात लवकर वाढीव विज बिल कमी करुन लॉकडाउन काळातील वीजबिल माफ करण्याचा निर्णय घ्यावा.अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा दिला.तसेच बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी चे तालुका प्रभारी नितीन कांबळे हे भूमिका मांडताना म्हणाले महाराष्ट्रात तसेच देशात बहुजन समाजाला तिसरा विकल्प बहुजन मुक्ती पार्टी हा निर्माण झाला आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरुन लढाई लढेल.यावेळी लहुजी क्रांती मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष विकास पाथ्रीकर आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) चे राज्य कार्याध्यक्ष अॅड. हर्षवर्धन नाथभजन यांनी आपल्या संघटनेसह या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला.भारतीय विद्यार्थी मोर्चा छात्रा प्रकोष्ठच्या जिल्हा प्रचारक मनीषा उजगरे यांनीही आपल्या संघटन शक्तीने पाठिंबा दर्शवला.बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका अध्यक्ष लहूकुमार गालफाडे यांनी आंदोलनाचे समारोपीय भाषण केले.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे शहराध्यक्ष नवनाथ कांबळे व अन्य पदाधिकारी सागर कदम,शिवाजी पारखे,गोविंद कांबळे,किशोर कांबळे, डी.एस. बडवणे नाना पांडुरंगदादा पवार,सुनील कांबळे,समाधान गवारे,रोहित कांबळे यांनी परिश्रम घेतले.यावेळी कविताताई कांबळे, पारखेताई,विशाखा कांबळे इत्यादी महिला उपस्थीत होत्या.