ताज्या घडामोडी

फुटपाथवर राहात असलेल्या मुलांबरोबर वाढदिवस साजरा

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

दिनांक 5 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते सुनिल जनबंधु यांना आपण समाजात गरीब, गरजू, अनाथ, अपंग, विधवा, अशा लोकांसाठी कार्य करतांना आपण पाहत आहोत. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी फुटपाथवर राहात असलेल्या मुलांबरोबर केक कापून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

त्यांना मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्थेतर्फे भोजन दान, कपडे दान करण्यात आले. फुटपाथवर राहात असलेल्या मुलांनी वाढदिवसाचा मनसोक्त आनंद घेतला . तीथे उपस्थित संस्थेचे संस्थापक, संस्थापक श्री.सुनिल जनबंधु, संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शेंदरे , विनिता लांडगे, सोनाली कांबळे, सारीखा कुडवे, सुजाता लांडगे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close