डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानामुळे भारतीय महिला आज मोकळा श्वास घेत आहेत – समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती ला दहन करून स्त्री मुक्तीची घोषणा क्रांतिकारक घटना आहे मनुस्मृती दहबाबरोबर स्त्रीयांचे दुय्यमत्व जळाले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाननात वेगवेगळे कायदे करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबानी स्त्रीयाना सशक्त केले म्हणून भारतीय स्त्री ही आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानामुळे मोकळा श्वास घेत आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी स्त्री मुक्ती दिन संबोधी बुद्ध विहाराचे वर्धापन दिन निमित्ताने संबोधी बुद्ध विहार व तक्षशिला बुद्ध विहार चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या कार्यक्रमात आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष नारायण कांबळे प्रमुख अतिथी माजी सरपंच दीक्षा भगत ऍड धनराज वंजारी रामदास कामडी हिना राऊत आदि उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की बाबासाहेबानी ज्या ठिकाणी स्त्रियांना कमी लेखले गेले त्याठिकाणी त्यानी स्त्रियांना कायदे करून प्रतिष्ठा मिळवून दिली आपल्या भाषणातून स्त्रियांना सगर्षं करण्यास प्रेरित केले कलम 12 ते 19 पर्यन्त स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार बहाल केले कलम 13 मनुस्मृती अवैध ठरविले कलम 14 स्त्री पुरुष समान आहेत कलम 15 जात वंश धर्म स्त्री पुरुष विषमता निर्माण करणारे भेदभाव नष्ट करण्यात आले कायद्यासमोर सर्व समान आहेत कलम 16 नोकरीत आरक्षण देऊन स्त्रीयाना सक्षम बनविले हिंदू कोड बिल देऊन अनिष्ट पितृसत्ताक पद्धतीला खुले आवाहन दिले शिक्षनाच्या जोरावर भारतीय महिलाचे जीवन घडवले स्त्रियांना धर्माच्या शोषणातून बाबासाहेबाणी मुक्त केले महिलांना जगाची ओळख करून दिली मतदानाचा अधिकार दिला स्त्रीना धर्माच्या शोषनातून मुक्त केले तेव्हा आजची परिस्थिती बघितले तर स्त्री स्त्री ची विरोधक आढळते हे बाबासाहेब याना अपेक्षित नव्हते बाबासाहेबांचे तर स्त्री संघटनेवर विश्वास होता त्याना विश्वासात घेतल्या शिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे ते म्हणत स्त्रियांना ते म्हणत मुलामुलींना खूप शिकवा महत्वाकांक्षी बनवा कुटुंबात निर्णय क्षमता घेण्याची भूमिका स्त्री नि ठेवावी आपल्या कुटुंबात समानता आहे की नाही हे शोधावे पतीची गुलामगिरी झुगारून द्यावी हे बाबासाहेब यांचे विचार महिलांना प्रगतीच्या मार्गाचे आहेत असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी करत असताना महिला नि आपले मत योग्य प्रतिनिधी ला द्यावे आपले मत विकू नका नव्या मनुचा चेहरा शोषण कडे नेणारा असेल तर ते महिलांनि लवकर ओळखायला हवा पण स्वतःचे शोषण होऊ नका देऊ कारण तुमचया संरक्षनासाठी भारतीय संविधान सशक्त आहे या कार्यक्रमाच्या वेळी स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या निकिता टेमभुरकर फिल्म उद्योग कडे पदार्पण केलेल्या शुभम भगत यांचे वामनराव पाटील फोऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन संजय लाडे यांनी केले तर आभार प्रेमय राऊत यांनी मानले