ताज्या घडामोडी

नेरी येथील ग्रामसभा तहकूब

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

पंचायत राजमध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली. चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी ग्राम सभेचे आयोजन केले होते. ही ग्रामसभा कोरम पूर्ण न करू शकल्याने तहकूब करण्यात आली.

पुढील सभेची तारीख दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठिक अकरा वाजता ग्रामपंचायत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यावरून नेरी येथील जनतेत ग्रामसभे विषयी उदासीनता दिसून येते किंवा ग्रामसभेची वेळ नाही लोकांच्या वेळेमध्ये घेतल्यास ग्रामसभेला अधिक प्रमाणात लोकसहभाग मिळेल. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन जनजागृती द्वारे ग्रामसभेचे महत्त्व लोकांना पटवून देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गावातील ग्रामसभा गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील लोक सभा असते गावातील लोकांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहे त्या ग्रामपंचायतीला सांगावे. ग्रामपंचायत गावाच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतला सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांच्या सहभाग असलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. तरी पुढील सभेला जास्तीत जास्त जनतेने सहभाग द्यावा असे आव्हान ग्रामपंचायतचे सरपंच रेखा पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रामपंचायत सचिव नखाते व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे ‌.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close