दुर्लक्षित महिलाना आयुष्यातुन उठवणाऱ्या प्रथावर समाजांनी वैचारीक प्रबोधन करणे काळाची गरज आहे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

बार्टी तर्फे जागतिक महिला दिन साजरा
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
विश्वातील अर्धी मानवी शक्ती ही स्त्री आहे ती शक्ती देशयाच्या विकासासाठी महत्वाची आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज महिलांना भारतीय संविधानामुळे स्वतंत्र मिळाले त्यामुळे सर्व क्षेत्रात महिलानि प्रगती केली असे जरि दिसून येत असले तरी अजूनही काही अश्या प्रथा आपल्या भारत देशयात आहेत ज्या स्त्रीयांचे आयुष्य हे फक्त अमानवीय व वेदनांनी विषमतेवर दिसून येते देवदासी देहविक्री करणाऱ्या स्त्रिया मुलींना विकणारे रॅकेट हे सर्व दुर्दैवी आहे अश्या वाईट प्रथा कायद्यानि बंद व्हयला हव्यात सरकारने सुद्धा त्यांना उद्योग देऊन पुनर्वसन करावे त्या महिलांना कडे फक्त उपभोगची वस्तू म्हणून पाहणाऱ्या ह्या प्रथा समाजात अजूनही सुरू कशा ? यावर कुठल्याही महिला का बोलत नाही?आज आम्ही सर्वजणी पुरस्कार सत्कार यात गुंतलेले आहोत पण भारतातील अश्या महिलांच्या आयुष्याचा कधीच विचार करत का नाही ? ती कशी जगत असेल ती या व्यवस्थेत कशी आली? कुठली अशी परिस्थिती होती तिच्यावर की ती महिला हे व्यवसाय करते तिच्या मुलांचे शिक्षण कसे होत असेल त्या मुलांचे वडील कोण ? तिचे आरोग्य कसे ? हे सर्व प्रश्न निरुत्तर आहेत कदाचित तिच्या ही निर्मिती तुन देशयाला कोहिनूर हिरा मिळतील पण तिच्या बद्दल चे सत्य व वास्तव समोर आपण आणून सरकारने समाजानी त्या महिलांना चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी बार्टी व महिला बालविकास केंद्र चिमूर यांच्या संयुक्त कार्यक्रमात आपल्या अद्यक्ष भाषणात मार्गदर्शन करताना जागतिक महिला दिनानिमित्त बोलत होत्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे पुढे बोलताना म्हणाल्या की ज्या आजूनही अपमानास्पद प्रथेत जीवन जगणाऱ्या महिला बद्दल चांगली भूमिका तिच्या समस्या बाबत लेखन महिलांनि संशोधन करून करावे व नावसमाज निर्मितीत हातभार लावावा आपल्या देहविक्री करणाऱ्या स्त्री कडे जाणे आणि घरी आल्याबरोबर सोवळे आचार करणे हा सज्जन मानवाचा धर्म आहे का?ही तर त्यांची अपवित्रता होय अश्या पुरुषांच्या ढोंगी वर्तणूक बद्दल महिला आपले मत का मांडत नाही?हे पुढच्या पिढीला चांगले होईल त्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे समाजातील आळशी वृत्ती ही देश्याच्या विकासासाठी घातक आहे या कार्यक्रमाचे संचालन माधुरी वीर यांनी केले तर कार्यक्रमाचे अद्यक्ष बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे प्रमुख अतिथी इंदू ताई बोभाटे प्रभाताई भट खिरीताई गुरुनेले शांती ताई चुणारकर होत्या तर कार्यक्रमाचे आभार इदूताई येळणे यांनी मानले.