मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे यांना साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यासाठी राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,शाल आणि पुस्तक देऊन खोब्रागडे यांना सन्मानित करण्यात आले.अनुसूचित जाती आणि नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे यांचे नेतृत्वात विद्यार्थीनींची शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे.सुनीता खोब्रागडे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार देण्यात आला.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव तथा राष्ट्र सेवा दलाचे दल मंडळ सदस्य सुरेश डांगे यांचे हस्ते खोब्रागडे यांना पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी मनोज राऊत,प्रियानंद गेडाम,ऋषिकेश मोटघरे, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.