वंदनीय राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली

ग्रामीण प्रतिनिधी: सुनिल गेडाम शिरपूर
तालुक्यातील नेरी येथून जवळ असलेल्या शिरपूर येथील गुरुदेव सेवा मंदिरामध्ये दिनांक 14/10/2022 ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वि पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गुरुदेव सेवक श्री. ऋषींजी सुकारे यांचे हस्ते करण्यात आले.नंतर श्रद्धांजली पर भजन घेण्यात आले आणि ठीक चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मौन श्रद्धांजली घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवंदना व समुदाईक प्रार्थना घेण्यात आली.
यावेळी मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास पा. बोरकर, सचिव दिवाकरजी डहारे, तसेच गुरुदेव सेवक श्री. संतोषभाऊ बोरकर,मोहन बोरकर, श्री. भाऊरावजी आदे, तुळशीदासजी आदे, रतनदासजी गावतुरे, गंगाधरजी भानारकर, डाकेश्वरजी सूर्यवंशी, उष्टुजी लेनगुरे तथा समस्त गुरुभक्त गावकरी, माता- भगिनी व बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.