आलापल्ली येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून ग्रामस्वछता अभियान
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून सकाळी ७:०० वाजता विर बाबुराव चौक आलापल्ली येथे
ग्रामस्वछता अभियान ची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाट्क आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंह तोलीया होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आवीस चे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून सहा. उपवनसंरक्षक नितेश देवगडे, तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर, मुख्याध्यापक गजानन लोंनबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गड्डमवार, माजी सरपंच विजय कुसनाके,जयप्रकाश शेंडे,मंगेश परसावार,महावीर अग्रवाल, पुष्पाताई अलोने, सुगंधाताई मडावी,सुमनताई खोब्रागडे, शारदाताई कडते,भाग्यश्रीताई बेझलवार आदी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांच्या संकल्पनेतून आलापल्ली ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी आलापल्ली येथील वीर बाबुराव सेडमाके मुख्य चौकापासून स्वछता अभियान सुरुवात करण्यात आले, त्यानंतर वेलगूर रोड, एटापल्ली रोड, ग्रामपंचायत भवन ते बस स्टॅन्ड परिसर तसेच चंद्रपूर रोड या मुख्य मार्गावर स्वछता अभियान राबविण्यात आले, या स्वछता अभियानास विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्वछ्तेची स्वतः पासून सुरुवात असा आदर्श सामान्य नागरिकांना देण्यासाठी उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया आणि माजी आमदार दीपकदादा आत्राम यांनी हातात झाडू घेऊन सदर स्वछता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला, चंद्रपूर मुख्य मार्गावरील राम मंदिर येथे कार्यक्रमाचा उपस्थित विध्यार्थी तथा नागरिकांना अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला, प्रसंगी माजी आमदार दिपकदादा यांचे उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन लाभले, सदर ग्राम स्वच्छता अभियानास ग्राम पंचायत आलापल्ली, राणि दुर्गावती विद्यालय आलापल्ली, विभागीय कार्यालय वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. आलापल्ली ग्राम स्वच्छताच्या या अभियानात आलापल्लीतील ग्रामस्थ तथा प्रतीष्ठीत नागरीक, व्यापारी बंधु, राणी दुर्गावती विद्यालय तथा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय तसेच ग्लोबल मीडिया केरला माँडेल स्कुल चे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्वछता अभियानात सहभाग नोंदविला, आलापल्ली वनविभागानी आलापल्ली ग्राम करिता पाहीलेले हिरवेगार शहर, स्वछ शहर, स्वप्नांचे शहर या संकल्पनेला यशस्वी करण्यास सहकार्य केले, प्रसंगी ग्रामपंचायत चे सर्वं सदस्य, व्यापारी वर्ग, नागरिक तथा विध्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी वनपाल अनिल झाडे,प्रभाकर आणकरी,दामोदर चिव्हाने,मनोहर भोयर,प्रकाश राजूरकर,ऋषीदेव तावाडे, बाळु मडावी,पूनम बुद्धावार,चंदू सडमेक,संतोष चौहान,उमाजी गोवर्धन आदी सह वनविभागाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.