रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड: राजा रावण हे आदिम संस्कृती चे श्रद्धास्थान व दैवत आहे. आदिवासींच्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा ऊद्राता असलेल्या नायप्रीय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावणा दुखावल्या जातात , म्हणून रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आफोड संघटना शाखा नागभीड, वीर बाबुराव शेडमाके बचत गट नागभीड च्या वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, तहसीलदार नागभीड, ठाणेदार नागभीड यांना देण्यात आले. नागभीड येथे दसरा या सनाच्या दिवशी राजा रावण दहन करण्याची कुप्रथा सुरू आहे, महात्मा राजा रावण संगीत तज्ञ विवेकवादी राजनीतिज्ञ, उत्कृष्ट रचनाकार न्यायप्रिय समाज व्यवस्थेचा उद्राता अशा अनेक गुणांना अविष्कार करणारा गुणवान राजा होता, अशा राजाला षडयंत्रकारी वर्णांध व्यवस्थेचे बदनाम केले आहेत. त्यांच्या विषयी कुप्रथा पसरवीण्यात आली आहे. वास्तविक राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही , तामिळनाडू मध्ये रावणाचे ३५२ मंदिरे आहेत. मध्यप्रदेशात मंदेसोर येथे १५ मीटर उंची ची मुर्ती आहे. महाराष्ट्रात अमरावती मेळघाट, गडचिरोली , चंद्रपूर तसेच छत्तीसगढ, झारखंड येथे राजा रावणाची पुजा केली जाते. निवेदन देताना शालीकराम मडावी, टी. पी मेश्राम, रवींद्र ऊईके, मदन मरस्कोल्हे, संदीप कुमरे , वासुदेव मसराम , दिगांबर ऊईके, सुधीर सयाम , गजेंद्र धुर्वे , पी. बी मडावी, आदी संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.