खुटाळा शेतशिवारात विहीरीत उडी मारुन तरुणाची आत्महत्या

दि .११ नोव्हेंबर तालुक्यातील नेरी जवळच असलेल्या मौजा खुटाळा येथील रहिवासी देवीदास रावन पाटील वय ४२ वर्षे या विवाहित तरुणाने मौजा खुटाळा शेतशिवारातील सोमेश्वर कामडी यांचे शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.तो बुटीबोरी येथे खाजगी कंपनीमध्ये काम करीत होता आणि शनिवारी नागपूरवरुन नेरी येथे आला होता . दरम्यान रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खुटाळा शेतशीवारातील कामडी यांचे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करुन त्याने स्वतःची जीवनयात्रा संपविली . दि .११ नोव्हेंबर ला वामन पोईनकर हा शेतकरी सोमेश्वर कामडी यांचे शेतातील विहिरी वर पाणी आणण्या करीता गेला असता विहिरीत प्रेत तरंगताना दिसले . आज ही माहिती लगेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली .त्या नंतर तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले व प्रेताला विहिरीतून बाहेर काढण्यात आले . आधार कार्डवरुन सदर मृतकाची ओळख पटली . घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली . सदर प्रेताचा पंचनामा सहाय्यक फौजदार सोनुने , पोलीस अमलदार सतिश झिलपे मेजर वरगंटीवार , रवी आठवले , रोशन तामशेटवार , सैनिक प्रमोद श्रीरामे यांनी करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे . आत्महत्या करण्यामागील कारण समजू शकले नसून . पुढील तपास नेरी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड हे करीत आहे.मृतकाचे मागे त्याचे परिवारात पत्नी एक मुलगी , एक भाऊ आहे .