पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाटाची आ. मेघना बोर्डीकर यांच्याकडून पाहणी
जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदी वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटाची धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी रविवारी पाहणी केली.
आमदार बोर्डीकर या रविवारी गोदाकाठावरील राजवाड्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यानंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, नारायणराव धनवटे ,होळकर घाटाच्या संवर्धनासाठी धडपड करणाऱ्या माजी सरपंच सीमाताई धनवटे, सौ शितल उद्धव शिंदे, ह भ प शिवाजी महाराज पडेगावकर , शिवाजी भुमरे ,राम शिंदे आदींनी आमदार बोर्डीकर यांना भेटून घाटाची पाहणी करावी अशी विनंती केली होती. घाटाची पाहणी नंतर आमदार बोर्डीकर यांनी आपण अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटाचे वैभव सुरक्षित कस राहील यासाठी राज्यपाल महोदयांना पत्रव्यवहार करू अशी माहिती शिष्टमंडळाला दिली. यावेळी ज्येष्ठ नेते गोपीनाथराव भोसले, क्षितिज चौधरी, रामेश्वर भोसले, अरुण मुंडे ,गोविंदराव रोडे, अर्जुन लटपटे , आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.