गोंडपिपरी शहरात दोन पिल्यासह अस्वलीचा वावर

नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी
शहरात दोन पिल्यासह अस्वल वावरत असून सायंकाळी 6 ते 10 च्या सुमारास हमखास अस्वलिसह पिल्लांचे दर्शन प्रभाग क्रमांक दोन आणि तीन ला लागलेल्या जंगला लगत होत असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंडपिपरी शहराला लागून असलेल्या जंगल परिसरात दोन पिल्यासह अस्वलीचा वावर आहे.
गोंडपीपरी मूल मार्गावरील असलेल्या साई नगरी जवळ दररोज अस्वल दोन पिल्यासह ये-जा करीत आहे .
मात्र आज पावेतो कुठल्याही नागरिकास धोका झालेला नाही मात्र दोन पिल्लांना जगविण्यासाठी धडपड करत असलेल्या या अस्वलीच्या हाती कोण लागेल हे सांगता येत नाही.यामुळे फिरणाऱ्या अस्वलीचा भीतीयुक्त धोका नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
गोंडपिपरी तालुका हा निसर्गमय असून नद्या, जंगलाने वेढलेला आहे.
शुद्ध पाणी हवा यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ आहे.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्याने सकाळ च्या सुमारास ह्याच मार्गावर व्यायामासाठी नागरिक येत असतात.
तसेच ह्याच परिसरात क्रीडा संकुल असल्याने खेडण्या-बागडण्यासाठी खेडाळू सुद्धा येत असतात.
त्यातच ह्या परिसरात नित्यनियमाने अस्वल दोन पिल्यासह फिरत असल्याने भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने या अस्वलीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
जंगलातील हिंस्त्र प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीत दाखल होत असल्याने मानव वन्यजीव संघर्ष पेटनार हे मात्र निश्चित.
गेल्या अनेक दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास परिसरात दोन पिल्यांसह अस्वल फिरत असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे कोणालाही धोका होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. – सागर मंगर, निवासी
गोंडपिंपरीत साई नगरी जवळ खेळाचे मैदान(क्रीडा संकुल) असल्यामुळे सायंकाळ– सकाळच्या सुमारास नागरिकांची वर्दळ त्याठिकाणी जास्त असते अशावेळी पिल्याऱ्या अस्वली कडून कोणत्याही मानव प्राण्यांना धोका होऊ नये यासाठी नागरिकांसह प्रशासनाने काळजी घ्यावी.
– अजितकुमार जैन, खेळाडू