तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे हस्ते सरकारी स्वस्त धान्य दुकान चे उद्घाटन
प्रतिनिधीःहेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर स्थापित तुलसी महिला बचत गट मूरपार यांना तहसिल कार्यालय चिमूर यांचे कडून सरकारी स्वस्त धान्य दुकान मिळाले असून या दुकानाचे महसूल सप्ताह तिसरा दिवस एक हात मदतीचा या दिवसाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम, निरीक्षण अधिकारी फुलके सर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. बारसागडे सर, तालुका व्यवस्थापक श्री. हरणे सर, प्रभाग समन्वयक श्री. बोरकर सर, सरपंच श्री. नंनावरे, तलाठी सौ. श्रीसागर मॅडम, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. अथरगडे व ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
तालुका अभियान व्यवस्थापक श्री. बारसागडे सर यांनी बचतीचे महत्त्व महिलांना पटवून दिले तसेच सरकारी स्वस्त धान्य दुकान मध्ये कुठलेही गैरप्रकार होणार नाही व कुठलीही तक्रार आपले कार्यालयास येणार नाही असे महिलांच्या वतीने ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषण करताना तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम यांनी शासनाच्या विविध योजनांचा माहिती दिली (त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नवीन मतदार नोंद, ई रेशन कार्ड) तसेच उपस्थित ग्रामस्थाशी चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काजल पाटील समूह संसाधन व्यक्ती यांनी केले तर आभार सौ. ममता सरपाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुलसी महीला बचत गट सर्व सदस्य, रुक्मिणी ग्रामसंघ मूरपार व ग्राम पंचायत मुरपार यांनी परिश्रम घेतले.