ताज्या घडामोडी

असरअली येथे खवल्या मांजर पकडुन आणनाऱ्या आरोपींना अटक

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सिरोंचा तालुक्यातील असरअली वनपरिक्षेत्राअंतर्गत चेतलपल्ली या गावातील काही इसमांनी 14 ऑगस्ट रोजी जंगलातून खवल्या मांजर पकडून आणले. त्याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी चेतन पाटील यांचा मार्गदर्शनाखाली त्या इसमांना अटक करून कवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले.
असरअली वनपरीक्षेत्रांतर्गत चेतलपल्ली या गावातील दिवाकर लसमय्या गावडे 14 ऑगस्ट ला जंगलात गेले असता खवल्या मांजर आडळून आला. त्याला पकडून जवडपास दोन दिवस आपल्या घरी ठेवला. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. अन हि माहिती असरअली येथील क्षेत्रसाहायक नवगरे यांना मिळताच, वनपरिक्षेत्राधिकारी चेतन पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी भूपेश तागडे वनपाल, रमेश मडावी वनपाल, सचिन सडमेक वनरक्षक, मरेश कोल्हे वनरक्षक, प्रीती पोटावी वनरक्षक, सुनीता वेलादी वनरक्षक, महेश दुगला वनमजूर, लक्ष्मण दद्वेरा वनमजूर, यांचा साहाय्याने आरोपीचा घरी जाऊन, अटक करून त्या खवल्या मांजराला ताब्यात घेण्यात आला. बातमी लिहेपर्यंत चौकशी सुरु होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close