ताज्या घडामोडी

मस्जिदवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला तात्काळ अटक करा-नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव शहरातील जुन्या भागात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच भागात 25 मार्चला मरकज मस्जिदच्या पाठीमागच्या भिंतीवर धुळवडीच्या दिवशी दळणवळण व लोकांची आवक जावक अत्यंत कमी असल्याचा व दुपारच्या वेळेला लोक घरात आराम करत असल्याचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह लिखाण केले होते. मस्जिदच्या आवारात पोलीस प्रशासन ड्युटीवर असताना सुद्धा ही घटना घडली. या लिखाणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावरून असे दिसून येते की त्या समाजकंटकांचा उद्देश दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा होता. सदर घटनेने मोठा नुकसान होण्याची शक्यता होती. पण येथील मुस्लिम समाजाने अत्यंत संयमाची भूमिका घेऊन कायदेशीर लढा दिला व पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. आतापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही तरी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकारा द्वारे केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close