महाविकास आघाडी तर्फे उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध म्हणून नागभीड मध्ये कडकडीत बंद
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
दि.११/१०/२०२१ रोज सोमवारला नागभीड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने उत्तरप्रदेश मध्ये लखीनपुर खिरी येथील न्याय मागणारे शेतकरी बांधव यांना तेथील भाजप नेते व गृहराज्य मंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवुन चिरडुन टाकले.
न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकने. व त्यांचा आंदोलन कमजोर करने हा केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारची चाल आहे.या हुकुमशाही सरकारचा महाविकास आघाडी सरकारतर्फे जाहीर निषेध करून नागभीड मध्ये कडकडीत बंद करण्यात आले. त्यासाठी आज नागभीड येथे व्यापारी संघटनेनी दुकाने बंद ठेवुन सहकार्य केले यावेळी महाविकास आघाडी नागभीड तर्फे बाईक रॅली काढून केंद्र सरकारचा व उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यात आले.
तसेच महाविकास आघाडी तर्फे तहसिलदार साहेबाला निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका विनोद नवघडे शहर अध्यक्ष रियाज शेख शिवसेना तालुका अध्यक्ष भोजराजभाऊ ज्ञानबोनवार, चंद्रपुर जि.प.गटनेते डॉ.सतिश वारजुकर, तालुका काँग्रेस कमिटी नागभीडचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, प्रहार चे वृषभ खापर्डे निलेश डोमडे राष्ट्रवादीचे युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष नासिर भाई शेख तालुका अध्यक्ष साजिदभाई सय्यद माजी तालुका अध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे, युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे , महिला जिल्हा उपाध्यक्ष नारायने ताई तालुका अध्यक्षा निर्मलाताई रेवतकर,शहर अध्यक्ष वनीताताई सोनकुसरे, सामाजिक न्याय विभागचे तालुका अध्यक्ष प्रशांत, असंगठित कामगारचे तालुका अध्यक्ष श्रीराम सहारे ज्येष्ठ कार्यकर्ता रामभाऊ शहाने युवा कार्यकर्ता सचिन बनकर, शेखर नारायने तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.