ताज्या घडामोडी

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा


प्रतिनिधी: राहुल गहुकर

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे 22 ऑक्टोंबर 2023 शुक्रवार रोजी भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सर्टिफिकेट कोर्स इन अपलिकेब्ल म्याठेमतिक्स या सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यासाठी सेमिनारचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निलेश ठवकर सर, डॉ. बिजनकुमार शिल सर, व प्रा. सुशीला गजभिये मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. नागेश ढोरे व आभारप्रदर्शन प्रा. सोनाली कांबळी यांनी केले. कार्यक्रम प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close