ताज्या घडामोडी

ईयत्ता पहिली ते आठ पर्यंतच्या विद्यार्थांना ऊर्दु भाषिकचे संपुर्ण विषयाचे पुस्तके उपलब्ध करुन द्या

मुख्य संपादक : कु.समिधा भैसारे

आज दिंनाक 04/10/2021 सोमवार रोजी उपविभागिय अधिकारी दर्शन निकाळजे तहसिलदार श्रिकात निळे व पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण गटशिक्षणअधिकारी राठोडसर यांना महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण कडुन ईयत्ता पहिली ते आठ पर्यंतच्या विद्यार्थांना ऊर्दु भाषिकचे संपुर्ण विषयाचे पुस्तक उपलब्ध करुन देण्यासाठी निवेदन देण्यात आले. विद्यार्थांना पुस्तके नसल्यामुळे विध्याथाचे नुकसान होत आहे व हे पुस्तके बाजारात पण उपलब्ध नाही. यामुळे ऊर्दु भाषिक विद्यार्थांचे नुकसान होत आहे तरी ईयत्ता 1 ली ते 8 पर्यंतचे पुस्तके या आठ दिवसात उपलब्ध करुन देण्यात यावे अन्यथा महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले अाहे . निवेदन देतांना प्रदेश संघटक अहमद अन्सारी ,शेख अजहर हदगावकर ,ईफतेखार बेलदार , अयुबखाॅन शेख ,जफर अत्तार , अन्वरखाॅन ईम्ररान अन्सारी ,अलताफ अन्सारी ,फेरोज अन्सारी , इत्यादी हजर होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close