महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती तुमसर रोड (रेल्वे स्टेशन) देव्हाडी येथे उत्साहात साजरी
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त तुमसर रोड (देव्हाडी) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक- 2 ऑक्टोबर 2021 ला गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त तुमसर रोड (रेल्वे स्टेशन) स्टेशन टोली देवाडी, येथे हेल्प युथ फाउंडेशन,नेहरू युवा केंद्र भंडारा, “शाळेबाहेरची शाळा’ खापा या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य, स्वचछता अभियान, नुत्य, वृक्षारोपण, असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून करोना जनजागृती करण्यात आली. मास्क वाटप, मास्क चा वापर, सुरक्षित अंतर, साबणाचा वापर , लसीकरण या बाबत लोकांना मध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी यांचा खूप मोलाचा सहभाग होता. खापा गावातील स्वंयसेवक अजय यादव, शुभम डोरले, राहुल कटणकर, हंसराज ढबाले तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन येथील समन्वयक हिना राऊत यानी सुद्धा मोठ्या उतसाहाने प्रतिसाद दिला आणि नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त नेहरू युवा केंद्र भंडारा मधील प्रतिनिधींनी स्टेशन सह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
गतवर्षी गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. शनिवार ला गांधी जयंतीचे औचित्य साधून बाजार चौक देव्हाडी परिसरातील रस्त्यावरील कचरा, प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेत नेहरू युवा केंद्र भंडारा चे प्रतिनिधी जयश्री बिसने, ज्योती चौधरी यांच्यासह कार्यकरते उतरले होते.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हेल्प युथ फाउंडेशन क्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. हेल्प युथ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रफुल बानासुरे यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता केली. रेल्वे परिसरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे तुमसर रोड चे माननीय सब इन्स्पेक्टर बी. के. हरवंश, डॉ. बनोथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. तर गावचे सरपंच तथा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल बाणासुरे यांनी स्वच्छता मोहिमेचे व वृक्षरोपणाचे विद्यार्थ्यांसमवेत आयोजन केले होते.