ताज्या घडामोडी

आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ ठरतोय उपक्रमशील मंडळ

दोन दिवसीय लसीकरण मोहीम

सतत ११ दिवसीय अन्नदान कार्यक्रम

गरजू लोकांकरिता ६दिवसीय मोफत उज्वला गॅस कनेक्शन नोंदणी प्रक्रिया

अत्यंत गरजू ५० परिवरातील लोकांनकरीता जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

बंपर लक्की ड्रॉ चे आयोजन

कोरोना रोगा पासून मुक्तता करीता होम हवन कार्यक्रमाचे आयोजन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे दोन दिवसीय लसीकरण मोहीम राबवण्यात आले कोरोना लस देण्या संदर्भात गावात दिवंडी देऊन माहिती देण्यात आले.
आलापल्लीतील नागरीकांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत ऐतिहासिक असे २४३ लोकांनी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरण उपक्रमात सहभाग घेतले.पहिल्यांदाच सार्वजनिक गणेश मंडळात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण घेण्यात आलेल्या मंडळात आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ सर्वात पुढे आहे
एवढेच नाही तर आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे सतत ११ दिवस अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले यात विशेष बाब म्हणजे कोरोना संसर्ग टाडण्यासाठी पूर्ण उपाय योजना मंडळा तर्फे करण्यात आले होते.नियमित मास्कचे वापर मंडळातील संपूर्ण सदस्य करत होते.अन्नदान सुरू असताना लोकांचे एकमेकांचे संपर्क टाडण्यासाठी डब्बे आखण्यात आले आणि नेमून दिलेल्या जागेवरच अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले.
आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळा तर्फे ६ दिवस मोफत उज्वला गॅस कनेक्शन नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आले यात एकूण ७० लोकांनी आपले नाव नोंदविले आणी आता काही दिवसातच मंडळा तर्फे गॅस वितरण करण्यात येणार आहे. आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे भक्तांनसाठी खास बंपर लक्की ड्रा चे आयोजन करण्यात आले होते यात आकर्षक दुचाकी HF100 ठेवण्यात आले होते आणी या लक्की ड्रॉ चे भाग्यविजेता मोदुमडगू येतील नित्यानंद मंडल ठरले.
११दिवस अन्नदान केल्यानंतर उरलेल्या वस्तूंचे ५० परिवारातील लोकांकरिता आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे जीवनआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
एवढेच नाही तर आलापल्लीतील युवक दिलीप वासुदेव चिलनकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती लक्षात घेता
आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे आठ हजार सातशे रूपयांची आर्थिक मदत करण्यात आले
अशे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांच्या हितासाठी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा विविधांगी उपक्रम राबविले विशेष बाब म्हणजे कोरोना शिस्तीचे पालन करत उत्कृष्टरित्या उपक्रम राबवीले
मागील चार वर्षापासून आयोजित सर्व आलापल्ली येथील युवक वर्ग तसेच या लाडका राजाच्या मुख्य आयोजक.
अध्यक्ष- अतुल आत्राम
उपाद्यक्ष- मनोज धुर्वे
सचिव – रुपेश श्रीरामवर
सहसचिव- सागर रामगोनवार
कोषाध्यक्ष -मयूर त्रीनगरीवार
सदस्य – सचिन रामगोनवार ,दीप कानाबार ,नवीन ताटीकोंडावार, साई तुलसीगिरी, वासू मुत्यालवार, अक्षय कोलपकवार, आकाश लेडीवार, आदर्श केसनवार, कुणाल,उमाकांत,अक्षय,रुनाल,दसरत,नितेश,मंगेश,सुजल,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close