ताज्या घडामोडी

ग्रा.पं. स्वउत्पनातुन कोसंबी येथे दिव्यांग तथा अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप

ग्रामीण प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड

ग्रा.प. कोसंबी गवळी येथील सन 2020 – 2021 च्या स्व : उत्पनातुन महिला व बालकल्याण विकास योजनेच्या 10 टक्के निधीतुन अंगणवाडी 1 व अंगणवाडी 2 येथील मुलामुलींना मा . जि . प . सदस्य श्री . संजयभाऊ गजपुरे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले . तसेच दिव्यांग व्यक्ती कु . सांदिपाणी अजय पिलारे , बळीराम श्रीहरी भरडे या दोन व्यक्तीना 5 टक्के निधीतुन 1 ड्रेस , 1 मच्छरदानी , 1 छत्री देण्यात आली . या कार्यक्रमाला श्री . दिलीप रंधये सरपंच , श्री . संदिप हेमने उपसरपंच , श्री , कैलास रंधये ग्रा.प. सदस्य , सौ . शिल्पा धोंगडे , श्रीमती . ज्योतीताई उईके श्री . मुळनकर ग्रामसेवक , श्री . वनरक्षक पाटील साहेब , श्री . मच्छिद्रजी चंन्नोळे माजी सरपंच , गुरूदेव नागापुरे , श्रीमती . चतुराबाई दडमल , सौ . रूपा दडमल अंगणवाडी सेविका , तथा मदतनिस कार्यक्रमाला उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close