चिमुर येथील पाणीपुरवठा योजना होणार लवकरच सुरू
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमूर :- चिमूर नगर परिषदची पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार नगर विकास विभागाचे सहसचिव जाधव यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,चिमूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना लवकरच काम सुरू करण्याचे दिले पत्र
अखेर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चे सरकार आल्याबरोबर या सरकारने जुन्या अनेक विकास कामावर स्थगिती आणली होती
मात्र चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे चिमूर नगर परिषद ची पाणी पुरवठा योजनेची स्थगिती उठवून त्या योजनेला मंजुरी देण्याची मागणी केली होती. या सर्व पाठपुराव्याला यश आले असून त्या कामावरील स्थगिती उठवून काम सुरू करण्याचे निर्देश नगर विकास विभागाचे सहसचिव यांनी संबंधित यंत्रणेला दिले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने चिमूर नगर परिषद क्षेत्रातील जनतेनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे जाहीर आभार मानले आहे.