ताज्या घडामोडी

बालाजीदेवस्थान चिमूर येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्रतिनिधी:राहुल गहुकर

श्रीहरी बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हटले जाते ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पालगत असलेल्या चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे तर विदर्भातील भाविकांसाठी चिमूरची घोडारथ यात्रा श्रध्देसह आकर्षक आहे अशा या श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरच्या यावर्षीच्या घोडारथ यात्रे निमित्याने इनार्च फाऊंडेशन चे संस्थापक डॉ. सुशांत घनशाम पिसे (नागपूर) यांच्या आरोग्यदायक समाज सेवेच्या संयुक्त संकल्पनेतून व पुढाकाराने श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी अशा दहा दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी 1 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला शिबिराचे उत्घाटन श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री निलम राचलवार सर यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक अरविंद गोठे सर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान शेकडो रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिराचे नियोजन सागर खोब्रागडे व मौनिष श्रीराम यांनी केले तर संपूर्ण शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हे इनार्च टिम च्या मार्गदर्शनात केले गेले. ज्यात डॉ. पायल डोंगरे डॉ. मृणाली राऊत डॉ. निशी चरडे आकांक्षा कोचे उर्वशी शुक्ला खुशाली कामीलकर प्रमोदिनी अंबादे सागर खोब्रागडे व मौनिष श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहाने पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close