ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातून तेलंगाना राज्यात अवैधरित्या जाणारी लाखो रुपयांचे सागवान जप्त

वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा हद्दीतील घटना.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सिरोंचा-:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात 24 सप्टेबर रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार वनऊपज तपासणी नाका चिंतलपल्ली येथे असरअल्ली मार्गाने तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक AP15 TA 0314 ची तपासणी सिरोंचा वनविभागाचे वनरक्षक धुर्वे यांनी कसुन तपासणी केली असता त्या वाहणात अवैधरीत्या सागवान वाहतूक होत असल्याची आढळले. यामध्ये साग छिलपाट 22 नग व साग पाट्या 32 नग असे एकुन 54 नग आढळले.याची एकुन
1.997 घ. मी.असुन किंमत 1,40,107 रूपये आहे.वाहन किंमत अंदाजे 3,00,000 रुपये एकूण 4,40,107 रुपये किमतीचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली. PRO NO-8624/215576दिनांक 24/09/2021 प्रमाणे जे. टी. निमसरकार क्षेत्र सहाय्यक सिरोंचा यांनी गाडी चालक सारय्या नारायण नलबुगा वय 27 वर्षे रा.असरअल्ली ता. सिरोंचा जि.गडचिरोली याचे नांवाने जारी करण्यात आले.सदर प्रकरणाचा तपास उपवनसंंरक्षक सुमितकुमार (भावसे)वनविभाग सिरोंचा व बढेकर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा व त्यांचे सहकारी करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close