चिमूर तालुका पदाधिकारी मार्गदर्शन व पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
चिमूर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, खासदार मा.गजाननजी कीर्तिकर व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंद्रपुर जिल्हा प्रमुख नीतिनभाऊ मत्ते यांचे मार्गदर्शनानुसार शिव संपर्क अभियाना अंतर्गत चिमूर व नागभीड़ तालुका पदाधिकारी मार्गदर्शन व पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.शिवसेनेने पक्षवाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.यासाठी कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांना दिले आहे. शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरू केले आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविणे, सर्व जनतेची कामे करणे, आपला पक्ष बळकट करणे,अधिकाधिक लोकांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढविणे, सरकार ज्या योजना राबवीत आहे त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत याची खातरजमा करणे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचविणे, लोकांचा विश्वास संपादन करणे आणि विधानसभा निहाय, तालुकानिहाय, पंचायत निहाय, गाव निहाय कामे करणे. इत्यादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम संपन्न झाला या वेळी, उप जिल्हा प्रमुख अमृत नखाते प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊरावजी ठोम्बरे होते, कार्यक्रमा करीता विशेष अतिथि म्हणून केवलरामजी पारधी सरपंच ग्राम पंचायत सौन्दरी तथा उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी,श्री, भोजराजजी ज्ञानभोर तालुका प्रमुख नागभीड़, श्री श्रीहरी सातपुते चिमूर तालुका प्रमुख, व माधुरी आकाश केमये चिमूर महिला तालुका प्रमुख, रोशन जुमड़े चिमूर तालुका संघटक, उपस्थित होते,
सदर कार्यक्रमात पदाधिकारी व शिवसैनिकाना मार्गदर्शन करण्यात आले, व 12 युवकानी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, चिमूर शहर प्रमुख, अनंता गिरी, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, किशोर उकुंडे, सुरेश गजभिये, नत्थुजी खाटे, महिला आघाडी उप तालुका प्रमुख विधा घुघूसकर विभाग प्रमुख भाऊराव गोहने, बंडू पारखी, सुधीर नंबावरे, राजेंद जाधव, आशीष बागुलकर, उपशहर प्रमुख सुभाष नंन्नावरे व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.