ग्रामगीता महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी:राहुल गहुकर
दिनांक 3 जानेवारी 2024 रोज बुधवारला, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमिर धमानी अध्यक्ष म्हणून तर आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर, डॉ. सौ. वरदा खटी, प्रा. जीवन सोनटक्के आणि प्रा. कु. संगीता हनवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अतिथी म्हणून उपस्थित डॉ. सौ. वरदा खटी यांनी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच प्रा. कु. संगीता हनवते यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांच्या संघर्ष विद्यार्थ्यांसमोर कथन करण्याच्या प्रयत्न केला. प्रा. सोनटक्के व डॉ. ठवकर यांनी सावित्रीबाईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर सावित्रीबाईंच्या शिक्षणाविषयीच्या संघर्ष डोक्यासमोर ठेवून उच्च शिक्षणात अग्रसर होण्याच्या प्रयत्न करावा असे मत मांडले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना समृद्ध व सुदृढ समाज निर्मितीसाठी स्त्री शिक्षण फार मोलाचे आहे. स्त्री शिक्षणाशिवाय सामाजिक विकास अशक्य आहे, असे मत डॉ. अमिर धमानी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कु. प्रणाली टेंभुर्णे व आभार प्रदर्शन प्रा. कु. शितल सावसाकडे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु. श्रद्धा डोईजड यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम कला व वाणिज्य विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता.