डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेला गीत गायन स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मध्दे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमीत्ताने तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धा ७ अगस्त रविवार रोजी ठेवण्यात आली होती.या स्पर्धा मध्दे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत यांनी तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धा मध्दे प्रथम तर समूहनृत्य स्पर्धा मध्दे तृतीय पारितोषिक मिळविले.
या कार्यक्रमासाठी मानवत चे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख लोहट साहेबांनी परिश्रम घेतले.तसेच किशोर तूपसागर सर व जोशी मॅडम यांनी पंचाचे काम करून योग्यरीत्या निकाल लावला.या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून सीमा सिसोदिया मॅडम कुसुम कच्छवे मॅडम यांनी उत्कृष्ट काम केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटील सर व जलसिंगे सर यांनी सुद्धा सहकार्य केले तसेच सूत्रसंचालन पकवाने सर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये सहभागी संघाचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गीत गायन स्पर्धा मध्दे प्रथम पारितोषिक मिळविले बदल डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत चे मुख्याध्यापक बागवान सलीम सर व पठाण जोहेब सर यांचे विद्यार्थीया सह पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले तसेच शाळा परीसरातील नागरिक यांनी प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.