आ.गुट्टे यांच्या प्रयत्नाने गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीचे खाते PFMS प्रणालीवर सलग्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी १५ वा वित्त आयोग अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतचे खाते पी. एफ. एम. एस. प्रणालीवर संलग्न करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ, परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. नवाब मलिक व जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केली होती. आमदार गुट्टे यांच्या सतत पाठपुराव्याने अखेर गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची खाती पीएफएमएस प्रणालीवर सलग्न करण्यात आली आहेत.
गंगाखेड पंचायत समिती अंतर्गत ८४ ग्रामपंचायतचे १५ वा वित्त आयोग अंतर अंतर्गत सिंडीकेट बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. परंतु सध्या सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झाले आहे. सदरील सिंडीकेट बँकेचे विलीनीकरण झाल्यामुळे पीएफएमएस प्रणालीवर खाते एमएपी झालेले नव्हते. पीएफएमएस प्रणालीवर खाते एम ए पी न झाल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील झालेल्या विकास कामांची देयके अदा करण्यास खूप मोठ्या प्रमाणात विलंब होत होता. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील सरपंच मंडळी त्रस्त झाली होती. १५ वा वित्त आयोग अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची खाते पी. एफ.एम.एस. प्रणालीवर सलग्न करून देण्याची मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. नवाब मलिक व जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. अखेर त्या मागणीला यश मिळाले असून गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची खाते पी एफ एम एस प्रणालीवर सलग्न करण्यात आली आहेत. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील सरपंच मंडळीकडून समाधान व्यक्त केले जात असून अनेकांनी आमदार गुट्टे यांना फोन करून त्यांचे आभारही मानले आहेत.