कर्तृत्वाचा गौरव – सन्मानाचा पुरस्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील मुळ रहिवाशी असलेली व सध्या सोलापूरात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी सुपरिचित चित्रकार रश्मि पचारे यांना मूल मुक्कामी नुकत्याच झालेल्या शानदार एका पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विशेष म्हणजे प्रथमच राष्ट्रीय लोकहित सेवाने हा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.समर्थ कुटुंबियांनी या प्रसंगी रश्मि पचारे यांचे मनस्वी अभिनंदन केले.महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना चावरे, चंद्रपूरच्या सुपरिचित अधिवक्ता पुनम वाघमारे, उपराजधानी नागपूरातील कर्जमुक्ती अभियानाच्या गिता मेहर या शिवाय चंद्रपूर शहरातील नामवंत कवयित्री सविता कोट्टी -सातपूते, सावलीच्या शैला चिमड्यालवार, सहजच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, मूलच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या अर्चना समर्थ, समता बन्सोड, औद्योगिक भद्रावती नगरीच्या व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक- अध्यक्ष कु. किरण साळवी, दुर्गापूर चंद्रपूरच्या कु.उज्वला निमगडे या वेळी उपस्थित होत्या.रश्मि पचारे यांना शालेय जीवनापासून चित्रकलेची अमाप आवड असून अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.काही वर्षांपूर्वी त्यांनी विदर्भातील पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षि स्व .वि.म.उजवणे यांचे हुबेहूब चित्र रेखाटले होते त्याच वेळी त्यांनी तिच्या कलेला दाद देत तिचे कौतुक व अभिनंदन केले होते.रश्मी ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपची एक सदस्य असून वेळोवेळी आपणांस मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय रजनी रणदिवे, विजया भांगे, विजया तत्वादी, सरोज हिवरे, सीमा पाटील, स्मिता बांडगे, छबू वैरागडे, यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे रश्मि म्हणाली .