मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणास लोकश्रेय चा पाठींबा

जिल्हा प्रतिनिधी:-अहमद अन्सारी परभणी
परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील आंदोलन मैदान येथे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील बेमुदत साखळी मराठा उपोषणास सुरू आहे या आंदोलनास लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने पाठीबा देऊन आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आपल्या सोबत आहोत असे सांगून मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या सारख्या मार्गाचा अवलंब करू नये त्यासाठी समाजातील अभ्यासक व ज्येष्ठ नागरिकांनी या संदर्भात जनजागृती करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मराठा समाजाला कुनबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी या प्रवर्गात समावेश करावाया या मागणीसाठी परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी 37 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहेत आज या धरणे आंदोलनात नांदापूर या गावातील सकल मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदविला आहे या जिल्हास्तरीय धरणे आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसभे मित्र मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून लोकसभे मित्र मंडळाच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देऊन आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आपल्या सोबत आहोत असे सांगून मराठा समाज बांधवांनी आत्महत्या या मार्गाकडे वळू नये यासाठी समाजातील तज्ञ मंडळींनी जनजागृती करावी असे अहवानही यावेळी त्यांनी केले. यावेळी मराठासमाजातील आरक्षणअभ्यासक,आंदोलनकर्त्या बांधवांनी आरक्षणाच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी लोकश्रेय मित्र मंडळा चे जिल्हाध्यक्ष शेख नईम, सय्यद ताजो दिन ,दानीश इनामदार सह नांदापूर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.