पाथरी येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त दत्तगुरुंना महाभिषेक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दत्त जन्मोत्सवानिमित्त साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे मा. संतोषराव दिनकरराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अर्चना चौधरी यांचे शुभ हस्ते दत्तगुरुंना महाभिषेक करण्यात आला. पूजेचे पौरोहीत्य योगेश इनामदार गुरुजी यांनी केले. यावेळी सौ छाया कुलकर्णी मंदिर अधिक्षिका , एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, बालाजी बेदरे, सौ शिवकन्या नाथठाणे , सौ कलाबाई कांबळे रामदास मस्के तसेच इतर साईभक्त उपस्थित होते. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे ह.भ.प. सौ छाया कुलकर्णी यांनी कीर्तन केले. संत सुरेशजी अब्दल महाराज मृदुंगाचार्य तसेच दत्ता साबळे, संतराम तायनाथ , आश्रुबा जोगदंड,गायनाचार्य तसेच नामदेव मस्के यांनी सुरेख साथ दिली. दत्त जन्मोत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.









