ताज्या घडामोडी

खेळांमुळे व्यक्तिमत्व घडते-सौ.भावना नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथील खेळाडू विविध क्रीडा प्रकारामध्ये विभागीय स्तरावर पात्र.

शालेय जीवनामध्ये खेळाला अत्यंत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे खेळामुळे मन ,मस्तिष्क व मनगट मजबूत होते खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होते शारीरिक क्षमता बौद्धिक विकास सांघिक भावना यांची वाढ होते त्यामुळे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन सौ.भावनाताई नखाते यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल, डॉज बॉल, कुस्ती ,तायक्वांदो ,बुद्धिबळ, कराटे, जलतरण आणि मैदानी स्पर्धा यामध्ये शांताबाई नखाते विद्यालयातील खेळाडूंनी जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावून विभागासाठी पात्र झाले आहेत, अशा खेळाडूंचा सत्कार समारंभ दिनांक 20 डिसेंबर 2022 मंगळवार रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथेआयोजित करण्यात आला होता याप्रसंगी त्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ .भाग्यश्रीताई टेंगसे, मुख्याध्यापक यादव एन.ई. प्राचार्य डहाळे के. एन, उप मुख्याध्यापक गुंडेकर आर.जे.,सौ .शोभाताई माटेकर, श्रीमती पतंगे एस. एम. आदी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के एन यांनी केले.१४ वर्ष मुले व्हॉलीबॉल मधील खेळाडू शिवराज नवले ,सुमित डहाळके ,युवराज ढगे, प्रशांत दुकाने ,आकाश शिंदे ,संस्कार वाघमारे ,करण चव्हाण ,अधिराज धर्म, केदार यादव ,गौरव बडे ,गौरव बंगाल व आदित्य शिंदे.१९ वर्षे मुली डॉजबॉल संघ दैवशाला नरवडे, पायल लाडाने, वैष्णवी साबळे ,धनश्री चौरे, सुप्रिया ब्रह्मराक्षे, श्रुती लाडाने ,तनुजा धोपटे, अंजली लीपने, कांचन साबळे आणि अंकिता गरड
कुस्तीमध्ये 19 वर्षे वयोगट आणि 17 वर्षे वयोगट मुलं आणि मुली
70 किलो आतील अभिषेक हरकळ, 53 किलो आतील वैष्णवी साबळे, 55 किलो आतील पायल लाडाने, नेहा गालफाडे, आरती क्षीरसागर ,ऋतुजा लगड.१७ वर्ष आतील मुली तायकांडो दिव्या राणेर ,तन्वी पोटभरे, प्रणिता शिंदे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रणिता शिंदे.कराटे स्पर्धेमध्ये शीलदीप गायकवाड.
जलतरण स्पर्धेत 19 वर्षे गट मुले
शिवम कोल्हे, रोहन भोसले, नामदेव शिंदे ,विश्वजीत भोसले, सुखाचार्य भोसले ४/१०० मी.रिले,१०० मी बॅकस्ट्रोक, ५० मी. बॅकस्ट्रोक, ५० मी. फ्री स्टाईल.मैदाणी स्पर्धेत 19 वर्ष मुले ४/४०० मी.रिले शिवम कोल्हे, जगदीश बोंडे ,एकनाथ कोकाटे, अशोक चौरे, रोहन ठाणे तर १०० मी.व २०० मी. धावणे एकनाथ कोकाटे.19 वर्ष मुली ४/१०० मी.रिले दैवशाला नरवडे, धनश्री चौरे, अंकिता गरड ,अनुष्का चव्हाण ,नंदिनी चौरे तर थाळी फेक तनुजा धोपटे हे सर्व विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत तसेच राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत खेळलेले खेळाडू आणि नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होणाऱ्या खेळाडूत श्वेता शिंदे धनश्री चौरे विकास राठोड या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक तथा तालुका संयोजक शेळके टी एस यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले
वरील खेळाडूंना क्रीडा शिक्षक तुकाराम शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close