ताज्या घडामोडी

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची निराधार महिलेस मदत

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

सततधार पाऊसामुळे तालुक्यातील अनेक घराची पडझड झाली असताना सिरसपूर च्या निराधार वृद्ध महिला लीलाबाई मेश्राम चे सुद्धा घर पडले. तेव्हा वृद्ध महिलेस आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी तात्काळ आर्थिक मदत केली.
लीलाबाई मेश्राम ही वृद्ध महिला निराधार असून ती एकटीच राहत असून कमकुवत परिस्थितीत जिवन जगत असताना पाऊसामुळे घरा ची पडझड झाली.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कडून आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, जेष्ठ नेते घनश्यामजी डुकरे, जिप क्षेत्रप्रमुख निलेश गभणे, उपसरपंच सुनील डोये, नरेंद्र डोये,सतीश वानखेडे, आकाश ढबाले आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close