ताज्या घडामोडी

चिमूर तालुक्यातील शिरपूर येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघाचा पुढाकार

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला ग्राम संघाच्या वतीने चिमूर तालुक्यातील मौजा शिरपूर येथे आजपासून दि.२९ मे 2022 रोज रविवारला आठवडी बाजाराची सुरुवात करण्यासाठी शुभारंभ करण्यात आला. आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याला एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात. ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो. गावातील आठवडी बाजार ही गावाच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे त्याच अनुषंगाने शिरपूर येथे सावित्रीबाई फुले ग्रामसंघ तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्यातील रविवारला आठवडी बाजार भरविण्यासाठी उद्घाटन करण्यात आले. हा आठवडी बाजार दर रविवारला नेहमी राहणार असून,आठवडी बाजार शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हा व्यवस्थापक, मा.प्रवीण भांडारकर प्रमुख पाहुणे तर मार्गदर्शक म्हणून राजेशजी बारसागडे तालुका अभियान व्यवस्थापक चिमूर, मा.प्रशांत मडावी ,रजनी खोब्रागडे तालुका व्यवस्थापक चिमूर या सर्वांनी महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला गावाच्या प्रथम नागरिक वैशालीताई निकोडे (सरपंच)) शिरपूर, ग्राम संघाच्या अध्यक्षा सुनिता डहारे, सचिव अस्मिता भांडारकर. कार्यक्रमाचे संचालन सारिका बाहुरे प्रभाग समन्वयक व आभार प्रदर्शन कृषी व्यवस्थापक प्रीती डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ,गावकरी ,महिला आणि इतर लोकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच बोथली येथील मत्स्यतलावाला भेट देण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close