ताज्या घडामोडी

ग्रामसेवक पथकाने श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

ग्रामीण प्रतिनिधी:सुनिल गेडाम सिरपुर

नेरी वरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरपूर ग्रामपंचायत च्या पुढाकाराणे ग्रामसेवक संघटना शाखा चिमूरच्या वतीने सिरपूर-बोथली नदीवर समस्त ग्रामसेवकाच्या उपस्थितीत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. “पाणी अडवा, पाणी जिरवा “या मोहिमेला अनुसरून शेतकरी, गावकरी तसेंच सर्व प्राणीमात्राना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे अशा उद्दात हेतूने व शिरपूर ग्रा. पं. चे ग्रामसेवक श्री. लोकचंदजी भसारकर यांच्या संकल्पनेतून ग्रामसेवक कर्मचारी वर्गाच्या शंभर टक्के उपस्थितीत वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
यावेळी वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाप्रसंगी पंचायत समिती चिमुरचे संवर्ग विकास अधिकारी मा. राठोड साहेब, पंचायत विस्तार अधिकारी श्यामकुळे साहेब, कृषी विस्तार अधिकारी कांबळे साहेब, कृषी विस्तार अधिकारी कुळसंगे साहेब, शिरपूर ग्रा. पं. चे ग्रामसेवक लोकचंदजी भसारकर साहेब, उपसरपंच राजेंद्र भानारकर, सदस्य जीवन बोरकर, जयपाल गावतुरे, पो. पा मंगेश भानारकर, वनहक्क समिती अध्यक्ष सुनिल गेडाम,ग्रा. पं. शिपाई गोपाल गावतुरे,पाणीपुरवठा कर्मचारी मोहन बोरकर, ज. म. संस्थाचे सचिव दिवाकरजी डहारे,गंगाधरजी भानारकर,विलास पा. बोरकर आणि गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close