स्व. नितीन महाविद्यालयात बहिःशाल व्याख्यानमाला संपन्न
जिल्हा प्रतिनिधी’-अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालयाच्या बहिःशाल शिक्षणकेंद्र व स्वा. रा.ती. म. वि. नांदेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवशीय बहिःशाल मालेचे पहिले पुष्प दि.13/1/2024रोजी प्रा.डाॕ. रमेश शिंदे यानी “राष्ट्र विकासात युवकांची भूमिका” या विषयावरगुंफले तर दि.16/1/2024रोजी प्रा.डाॕ नितीन बावळे यांनी”योगाद्वारे तनामनाचे आरोग्य ” या विषयावर व्याख्या न दिले दोन्ही व्याख्यात्यांनी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नां उत्तरे दिली.
या दोन दिवशीय बहिःशाल व्याख्यान मालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डाॕ. एस टी.सामाले हे उपस्थित होते.या व्याख्यान मालेचे उद्घाटन प्रा.डाॕ.भारत निर्वळ यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहिःशाल शिक्षण केंद्र प्रमुख प्रा.डाॕ. मोरे जी. जे यांनी केले .आभार प्रो.बोचरे जे.एम यांनी केले तर बहारदार सूत्रसंचलन प्रा. डाॕ. मोरे जी.जे. यांनी केले.
यावेळी बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक व नागरिक उपस्थित होते.