लंपी रोगाची पशुधनास सात आल्याने लोणी बुद्रुक येथील शेतकरी हैरान

जिल्हा प्रतिनिधीः अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या काही आठ पंधरा दिवसापासून पशुधनास लंप रोगाची साथ आल्याने शेतकरी खूप हैराण झाले आहेत सदरील माहिती अशी की पशुधन वैद्य अधिकारी बाबळगाव सर्कल मध्ये व लोणी बुद्रुक कानपूर अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पशुधनास पाहणी करण्यासाठी येत नसल्याने या गावांमधील शेतकऱ्यांनी काय करावे व कोठे जावे कोण्या डॉक्टरांकडे संपर्क साधावा या चिंतेत शेतकरी आढळून येत आहेत तरी पशुधन अधिकारी यांनी लवकरात लवकर पाहणी करून लसीकरण उपलब्ध करून पशुधनाचे जीव वाचवले असे शेतकऱ्यातून बोलले जाते पशुधनावर आधारित जीनौदार करणारे किशन आवचार यांच्या बैलाला लंपी रोगाची साथ येऊन काल दिनांक 5/6/2023 वार सोमवार या दिवशी दोन वाजे सुमारास बैल किंमत चाळीस हजार रुपये एवढ्या किमतीचा बैल वारल्याने या पशुधनाचे किसन अवचार यांना खूप दुःख झाले आहे तरी शासनाने होईल तेवढी मदत करावी असे त्यांचे म्हणणे आहे तसेच पशुधन अधिकारी यांनी लवकरात लवकर येऊन बाबळगाव सर्कल मधील पशुधनाची पाहणी करून लसीकरण उपलब्ध करून लस देण्यात यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.