नेरी येथे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दि. १२ फेब्रुवारी २०२२ ला महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज नेरी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतिससुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचा उदघाटन सोहळा तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा १९१ वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. स्मारकाच्या बांधकामाला उशीर झाल्यामुळे व कोरोनाच्या बंधनामुळे जयंती उत्सव ३ जानेवारी ला न घेता १२ फेब्रुवारीला घेण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना त्याच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेले कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहील. क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्री शिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतीकारी समाजसुधारक होत्या. त्यांचे कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज नेरी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकांचा उद्घाटन सोहळा तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 191 वा दोन दिवसीय जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
जयंती महोत्सव निमित्य दि. ११ फेब्रुवारीला प्रश्नमंजुषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अश्या थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित व जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले.या स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
दि. १२ फेब्रुवारी ला 12 वाजता माळी मोहल्यातून प्रभात फेरी काढण्यात आली व स्मारकाचे उदघाटन मा. संजयराव डोंगरे, विजयराव कडूकार, रेखाताई पिसे सरपंच ग्रा. प. नेरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी सहारे माजी सरपंच ग्राम पंचायत नेरी होते.
विशेष अतिथी म्हणून लताताई पिसे सभापती पंचायत समिती चिमूर,रेखाताई पिसे सरपंच ग्राम पंचायत नेरी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शिवश्री रामचंद्रजी सालेकर जिल्हा अध्यक्ष डॉ. पं. देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद चंद्रपूर,राजूरवाडे मॅडम समतादूत बार्टी पुणे, ज्ञानेश्वर नागदेवते सर माजी शिक्षक जनता विद्यालय नेरी आणिअर्चनाताई डोंगरे मॅडम प्राचार्य सरस्वती कन्या विद्यालय नेरी होते. तरप्रमुख अतिथी वसंतराव कामडी सदस्य ग्राम पंचायत नेरी, ललिताताई कडूकार सदस्या ग्राम पंचायत नेरी, प्रभाकर लोथे अध्यक्ष माळी समाज नेरी,पांडुरंग मेश्राम शिक्षक,राजीव पडवेकर उपाध्यक्ष माळी समाज नेरी, विनोद मेश्राम सारडपर, शंकरराव मेश्राम उसेगाव इ. मान्यवर आणि माळी समाजातील सर्व बंधू व मंडळाचे सदस्य स्वप्नील बारस्कार, अंकित कामडी, खिमदेव चौधरी, सचिन बारस्कार, विकास चौधरी, प्रशांत कडूकार, शंकर सहारे, अजय बनकर, प्रवीण कामडी, आकाश लटे, सचिन गाणार, अक्षय कामडी, साहिल कामडी व इतर सर्व सदस्य उपस्तिथ होते.
या कार्यक्रमाचे संचालन सुमित लांजेकार यांनी केले तर प्रस्तावित सौरभ सहारे आणि आभार प्रदर्शन नितेश कामडी यांनी केले.